मुख्यमंत्री सहायता निधीला शिवछायाची एक लाखांची मदत

2522

नवी मुंबई शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला गुरुवारी एक लाख रुपयांची मदत केली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा धनादेश कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्याकडे सुपूर्द केला. शिवछाया मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव नवी मुंबईचा राजा या नावाने प्रसिध्द आहे. यापुर्वीही मंडळाने संकटाच्या काळात अनेकवेळा मदतीचा हात पुढे केला आहे. महापुराचा तडाखा बसलेल्या सांगली शहरातील एका आश्रमशाळेला मंडळाने भरीव मदत केली होती. कोरोनाचा वाढत असलेला फैलाव रोखण्यासाठी मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला गुरुवारी एक लाख रुपयांची मदत केली. मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी मदतीचा धनादेश कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्याकडे दिला. या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अशोक पाटील, रामकृष्ण पाटील आणि संजय गुरव आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या