‘शिवनेरी’वरील विकासकामे दर्जेदार होतील अशी काळजी घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ajit-pawar-deputy-cm

कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने आपणा सर्वांना सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षी मार्च पासून कोरोनाचे संकट आले. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण, उत्सव साधेपणाने साजरे केले. यंदा 19 फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती साधेपणाने साजरी करू. शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. जेथे पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे तेथे परवानग्या घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या