तुषार यादव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिह्यातील वाडा येथील कडवट शिवसैनिक आणि माजी सरपंच तुषार यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 49 वर्षे होते. त्यांनी अखंडपणे सेवाव्रतीप्रमाणे शिवसेनेचे काम केले. ते अविवाहित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे प्रभावित होऊन विद्यार्थीदशेतच तुषार यादव यांनी शिवसेनेच्या कार्यात झोकून दिले. त्यांनी विविध पदांवर काम केले. वाडा सरपंचपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात वाडा शहरात अनेक विकासकामे झाली. प्रसंगाला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. पंत या नावाने ते वाडा तालुक्यात परिचित होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वाडा येथील वैपुंठभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.