
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, परळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना बूथप्रमुखांच्या बैठका संपन्न झाल्या.
येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी निवडण्यात आलेल्या सर्व बूथप्रमुख व पोलिंग एजंट यांच्या जबाबदाऱ्यांची सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म भरण्याचा शुभारंभ देखील करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सचीन मुळूक, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, विधानसभाप्रमुख राजाभैया पांडे, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभूते, विध्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अतुल दुबे, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, युवासेना समन्वयक संतोष चौधरी, उपशहरप्रमुख मोहन राजमाने, किशन बुंदेले, अमर टाकळकर, कृष्णा सुरवसे, मोहन परदेशी,अमित कचरे,बजरंग औटी गजानन कोकीळ, प्रसन्न दहिवाळ, यांच्यासह बूथप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
































































