शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार जाहीर, शिवसेनेचे सचिन पडवळ मानकरी

1029

पालिकेच्या 2018-19च्या प्रभाग समिती गौरव पुरस्कारांची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली असून उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून एफ/दक्षिण-उत्तर विभागाचे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी हा पुरस्कार पटकावला. उत्कृष्ट सहाय्यक आयुक्त म्हणून जी/दक्षिण विभागाचा पुरस्कार शरद उघडे यांना तर जी/उत्तरचा पुरस्कार किरण दिघावकर यांनी पटकावला आहे.

या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गुणकंत अधिकारी म्हणून उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून आर-उत्तर विभागाच्या परिचारिका पूजा नाणोसकर, बाजार निरीक्षणचे धर्मा कन्हीराम राठोड, नायर रुग्णालयाचे मुख्य लिपिक नरेश अनंत नाईक तर उत्कृष्ट कामगार म्हणून देवनार पशुवधगृहाचे अशोक पांडुरंग ससाणे, जी-उत्तर विभागाचे रोड रोलर स्वच्छक मुल्लाजी रफिक अब्दुल कादिर तर नायर रुग्णालयाचे हमाल प्रवीण परशुराम आडिवरेकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या