
कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेच्या दीपाली सय्यद व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची थेट लढत होणार आहे.























































