
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सध्या आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसह 45 ते 59 आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाला रोखण्यासाठी आता सरसकटपणे 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.
धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल शेवाळे यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता, मात्र नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखे सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवले होते. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठय़ा संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, असा विश्वास त्यांनी डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केलेल्या लेखी मागणीत व्यक्त केला.
ऑक्सिजन तुटवडय़ावर ‘बीएआरसी’ची मदत घेणार
राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवडय़ाची समस्या सोडवण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीचे सेव्रेटरी आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे (बीएआरसी) चेअरमन के. एन. व्यास यांच्यासोबत यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी या भेटीत पृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत सल्ला आणि तांत्रिक मदत करण्यास अनुपूलता दाखवली आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार आणि भाभा अॅटोमिक एनर्जीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे, अशी माहिती शेवाळे यांनी दिली.
































































