दर्जेदार शिक्षण देणाऱया संस्थांकडून केवळ सेवाशुल्क आकारा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील बालकांचे दर्जेदार शिक्षण घडवण्यासाठी अपार मेहनत घेणाऱया संस्थांकडून पालिकेने भाडय़ापोटी केवळ सेवाशुल्क किंवा हजार रुपये प्रति वर्गखोली भाडे आकारावे, अशी मागणी शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली.

मुंबई पालिकेच्या प्राथमिक शाळेतील अनेक वर्गखोल्या वापराविना पडून होत्या. या खोल्या 178 खासगी संस्थांना सशर्त वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. एक हजार रुपये प्रति खोली आणि दरवर्षी दहा टक्के वाढ अशा अटीवर खासगी संस्थांना या वर्गखोल्या देण्यात आल्या आहेत. या अटीमुळे गेल्या 20 ते 25 वर्षापासून वापरात असलेल्या खोल्यांचे भाडे प्रति वर्गखोलीमागे पाच ते सहा हजार रुपये झाले आहे. शासनाचे कुठलेही अनुदान न मिळणाऱया या संस्थांना एवढे भाडे भरणे डोईजड झाले आहे, याकडे अभ्यंकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.