शिवसेनेच्या दिव्यांग शिबिरात 154 रुग्णांची कृत्रिम अवयवांसाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । परभणी

शिवसेनेचे आ.डॉ.राहूल पाटील यांच्या पुढाकाराने बुधवारी नूतन विद्यालयाच्या प्रांगणात दिव्यांग, कर्णबधीर व मुकबधीर रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया व हायड्रॉलिक अवयव वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकंदर 737 रुग्णांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 154 दिव्यांग रुग्णांना तपासणी व मोजणी करून हायड्रॉलिक हात-पाय वाटपासाठी तसेच 78 कर्णबधीर व मुकबधीर रुग्णांची कॉकलर इनप्लॅन्ट शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती शिबिराचे समन्वयक राहुल कांबळे यांनी दिली. दोन दिवसीय शिबिरात परभणी, जिंतूर, वालूर, सोनपेठ, गंगाखेड, वसमत, पूर्णा, पाथरी, मानवत तालुक्याच्या ग्रामीण भागातून दिव्यांग व कर्णबधीर व मुकबधीर रुग्णांनी नोंदणी केली.

या रुग्णांची तपासणी करण्यासाठी मुंबई येथील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. विरेंद्र पवार, डॉ.शैलेंद्र सक्सेना, डॉ.राधारमण, डॉ. दिनेश बेळणेकर, डॉ. सचिन वाडकर व त्यांचे सहकारी गजानन साबळे आदींना आमंत्रित करण्यात आले होते. दिव्यांग रुग्णांना नोंदणी कक्षापासून तपासणी कक्षापर्यंत नेण्यासाठी शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते गेले दोन दिवस झटत होते. मंगळवारी नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. तर बुधवारी निवड केलेल्या दिव्यांग रुग्णांची अवयव बसवण्यासाठी मोजणी करण्यात आली. अतिशय महागड्या असणाऱ्या कॉकलर इनप्लॅन्ट शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत. जन्मतः मुकबधीर व कर्णबधीर असलेल्या रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगता येणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवा सेना शहरप्रमुख विशु डहाळे, बाळाराजे तळेकर, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, संभानाथ काळे, स्वप्निल भारती, संदिप पांगरकर, गौतम भराडे, पैजुल्ला पठाण, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, राहूल खटींग, मारोती तिथे, तुषार चोभारकर, मकरंद कुलकर्णी, विजय काळे, सचिन सामाले, बाबु फुलपगार, अमित हराळ, राहूल वहिवाळ, पांडुरंग देशमुख, मिलिंद घुसळे, गिरीष पाटील, विशाल वसमतकर, अशोक गव्हाणे, दिलीप गिराम, गणेश नखाते, संजय सामाले, गुणाजी अवकाळे, रुपेश देवडे, गौरव तपके आदींनी पुढाकार घेतला.