देवबाग येथील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत

429

देवबाग येथील पूरग्रस्त व सागरी अतिक्रमण बाधित कुटुंबीयांना शिवसेना डोंबिवली शहर महिला आघाडी व स्थानिक पदाधिकारी यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रविवारी करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील पूरग्रस्त भागात मदतीचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मालवण देवबाग येथेही सुमारे 350 जणांना अन्नधान्यसह 16 जीवनावश्यक वस्तू व महिलांना साड्या वाटप करण्यात आले.

डोंबिवली महिला आघाडी शहर संघटक किरण मोंडकर, उपशहर संघटक सीमा अय्यर, विभागप्रमुख प्रतिमा शिरोडकर, शाखा प्रमुख संजय मांजरेकर, उपशहर संघटक गुलाब म्हात्रे, शाखा संघटक संध्या शिर्के, प्रतिमा नारखेडे, सानिका खाडे यासह मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, पस सदस्य मधुरा चोपडेकर, उपसरपंच तमास फर्नांडिस, अनिल केळुसकर, रमेश कद्रेकर, फिलसू फर्नांडिस, मकरंद चोपडेकर, महेश शिरपुटे, अक्षय रेवंडकर व अन्य शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पूर व नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे नुकसान झाले. शिवसेनेसोबत युती शासनाच्या माध्यमातूनही मदत उपलब्ध केली जात आहे. देवबाग येथे 350 जणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र, अद्यापही काहीजणांना मदत मिळालेली नाही. अशा कुटुंबाना चार दिवसात आमदार वैभव नाईक व मालवण तालुका शिवसेनेच्या माध्यमातून मदत दिली जाईल, असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या