
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शिवसेना महिला जिल्हासंघटिका डॉ.भारती दुदानी यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. येनबोथली या गावात 5 दिवसा आधी एका अल्पवयीन मुलीवर चुलत काकानेच अत्याचार करून कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासली. या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवसेना महिला जिल्हासंघटिका भारती दुदानी यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत अत्याचार करणाऱ्या नराधम काकाला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका मायाताई पटले, शहर संघटिका वर्षा कोठेकर, शोभा वाघमारे सह शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होते.



























































