
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्रमांक 10 मधील माहीम विधानसभेच्या शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
उपविधानसभा संघटक सूर्यकांत बिर्जे (शाखा क्रमांक 192, 193, 194), उमेश महाले (182, 190, 191), उपविभाग समन्वयक अशोक केळकर (191, 192), संजय केणी (182, 190), शाखाप्रमुख विनय आव्रे (182), सचिन मयेकर (190), शाखा समन्वयक संतोष सुर्वे (182), भूपेंद्र राऊळ (190), विजय नागवेकर (191), गणेश देवकर (193), शाखा संघटक जोगेश तरे (182), संदीप गमरे (190), किशोर पाटील (191). शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
युवासेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) युवासेना जिल्हा समन्वयकपदी दुर्गेश साळवी यांची नियुक्ती केली आहे, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




























































