परळमध्ये शिवसैनिकांचा आज विजय मेळावा, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

712
aaditya-thackeray
वरळी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवणारे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्य यांची मंत्री म्हणून ही पहिलीच टर्म आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने शिवसैनिकांचा विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा बुधवार, 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता परळच्या दामोदर नाटय़गृहात आयोजित केला आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना उपनेते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, अभिनेते दिगंबर नाईक, सुशांत शेलार, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, माजी खासदार मोहन रावले, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या ‘विजय संकल्प’ मेळाव्याला शिवडी विधानसभेतील महिला, पुरुष, शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मेळाव्याचे आयोजक अजय चौधरी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या