राज्य सरकारकडून महाराष्ट्र खिळखिळा करण्याचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने चांगले काम करत अनेक प्रकल्प राज्यात आणले होते. कोरोना संसर्गाशी यशस्वी सामना करत भरीव काम केले. मात्र, केंद्र आणि सध्याचे राज्य सरकार एकाच विचाराचे झाले आहे. त्यामुळे आता अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. राज्य सरकारमुळे महाराष्ट्र खिळखिळा करण्याचे काम सुरू असल्याची टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली.

कुडाळमधील सभेत त्यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी  त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधित गुह्यात न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाधव यांनी सोमवारी जबाब नोंदविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.