
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्रमांक 9 मधील शीव-कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीस देण्यात आली.
उपविभागप्रमुख – गोपाळ शेलार (शाखा क्रमांक 173, 175) आणि विनायक तांडेल (शाखा 174, 179), विधानसभा समन्वयक – रवींद्र परब (शीव कोळीवाडा), उपविभाग संघटक – प्रणिता वाघधरे (शाखा 172, 176), विधानसभा संघटक – पद्मा शिंदे (शीव कोळीवाडा), विधानसभा समन्वयक – रिना खुराणा (शीव कोळीवाडा) अशा या नियुक्त्या आहेत.






























































