रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उरण, पनवेल व कर्जत विधानसभा सहसंपर्कप्रमुखपदी रघुनाथ (भाई) शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खालापूर तालुकाप्रमुखपदी एकनाथ पिंगळे तर कर्जत-खालापूर विधानसभा संपर्कप्रमुखपदी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.