
सामना ऑनलाईन । मुंबई
कोल्हापूर, सातारा, सांगलीसह राज्यभरात पुराचं थैमान सुरू आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुराच्या तडाख्यात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेने मदत केंद्र सुरू केले आहे.
शिवसेना भवन येथील पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्यांना पूरग्रस्तांना मदत करायची असेल त्यांनी तांदूळ, डाळी-कडधान्ये, तेल, कांदे, मीठ, बटाटे, मिनरल वॉटर, चांगले कपडे, सॅनिटरी नॅपकीन, प्रथमोपचार पेटी, बिस्किटे, खाद्यपदार्थांची हवाबंद पाकिटे, ब्लँकेट, टॉवेल, साखर, ताट, वाट्या, ग्लासेस, चमचे अशी मदत करावी. ही सामग्री व्यवस्थित पॅक करून आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या मदत केंद्राच्या अधिक माहितीकरिता 1800228595 (टोल फ्री) किंवा 022-24398230 या क्रमांकावर संपर्क साधावा. मदत केंद्राचा पत्ता- शिवसेना भवन, पहिला मजला, राम गणेश गडकरी चौक, दादर पश्चिम, मुंबई- 400 028.
सांगली, कराड, सोलापूर भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा या संस्थेनेही आवाहन केले आहे. या मदत कार्यात जे जे मदत देण्यास इच्छुक आहेत त्यांनी ती मदत रोख स्वरूपात, धान्य स्वरूपात, कपड़े स्वरुपात (चांगले व घालण्यायोग्य)द्यावी अशी विनंती केली आहे.
ज्यांना ती मदत द्यायची आहे त्यांनी खालील पत्त्यावर दि.11 ऑगस्टपर्यंत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.
1. दीक्षित सायकल मार्ट, पंचमुखी मंदिरासमोर, सातारा
2. श्री दत्त बॅग हाऊस, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, करंजे, सातारा
3. श्री दत्त भेळ, कलेक्टर ऑफीस शेजारी, पोवईनाका, सातारा
या मदतीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत-
सतिश ओतारी
9423254748
अभिजीत बारटक्के
9823898918 (गुगल पे )
शुभम शिंदे
9762840077
मंदार मेणकर
9766671717

























































