शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनलचे 21 उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनच्या निवडणूक मैदानात आता शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलचे 21 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

 जाहीर केलेल्या 21 उमेदवारांमध्ये आदियोदातो कार्मो मोण्टेरो, सुहास बने,अॅड. प्रशांत देशमुख, संजय ढोलम, नगरसेवक संजय घाडी, प्रियांका घाणेकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, किरनराज जैन, प्रशांत कदम, कमलाकर नाईक, सचिन पाटील, विठ्ठल पवार, उन्मेश रावते, आमदार सुनील राऊत, संदीप सावंत, अनिल सावंत, परमेश्वर थोरात, नामदेव गवंडी, मनोज संखे, सुनीता गोडबोले व दीपा पाटील यांचा समावेश आहे. रविवार, 30 सप्टेंबर रोजी दादर पूर्व येथील राजा शिवाजी विद्यालय येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानात सभासदांनी विमान निशाणीवर शिक्का मारून शिवप्रेरणा पॅनेलला बहुमताने विजयी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार विभागवार प्रचार सुरू झाला असून त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच दादर येथील मेळाव्यात शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते पॅनेलच्या वेबसाइटचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, आमदार अजय चौधरी, सुनील राऊत, विभागप्रमुख सदा सरवणकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, दगडू सकपाळ, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर उपस्थित होते.