तिरूपतीला पायी निघालेल्या शिवसैनिकाचा प्रत्येक गावात सत्कार

1407

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास, बीडहून तिरूपतीपर्यंत पायी वारी करेल असे साकडे शिवसैनिक सुमंत रूईकर व श्रीधर जाधव यांनी घातले होते. आता उद्ध ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते दोघे तिरूपतीकडे रवाना झाले आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे शिवसैनिकांकडून सत्कार करण्यात येत आहे.

बीड येथील निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रूईकर व श्रीधर जाधव यांनी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर बीड ते तिरूपती बालाजीला पायी वारी करेल असे साकडे घातले होते. त्यांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून 5 डिसेंबर रोजी ते बीडहून तिरूपती बालाजीकडे निघाले आहेत. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांच्यासह शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी पायी यात्रेला सुरूवात केली. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे ते मंगळवारी पोहचले आहेत. 175 कि.मी.चा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणच्या शिवसैनिकांनी पायी तिरूपतीकडे निघालेल्या सुमंत रूईकर, श्रीधर जाधव यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. चौसाळा येथे लोकसभा संघटक, ज्येष्ठ शिवसैनिक विलास महाराज शिंदे यांनीही त्यांचे स्वागत केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे तुळजापूरमध्ये शहरप्रमुख सुधीर कदम यांनीही सत्कार करून या यात्रेला शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या