मालवण पालिकेत युतीची ताकद वाढली

832

मालवणात विरोधी गटाचे नेते मंदार केणी यांच्यासह नगरसेवक यतीन खोत, दर्शना कासवकर, शीला गिरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मालवण पालिकेत युतीचे संख्याबळ 10 वरून 14 झाले आहे. पालिकेत युती अधिक मजबूत झाल्याचा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या चार नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजवणाऱ्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भूमिका स्पष्ट केली. चारही नगरसेवकांनी निस्वार्थीपणे शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत काम करून संघटना अधिक मजबूत करणार आणि आमदार वैभव नाईक यांना मताधिक्याने विजयी करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या