
महापालिका आणि स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीतही विधानसभेप्रमाणे मतदारयादीत घोटाळा आणि यंत्रणेत घोळ होणार असेल तर या निवडणुकांना काही अर्थ नाही. याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य आणि केंद्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवदेन दिले. त्यावर त्यांनी काहीही निर्णय न घेता, ते निवदेन केंद्राकडे पाठवले आहे. त्यांना निर्णय घ्यायचे नसतील तर राज्यात त्यांना राज्यात कशासाठी नेमले आहे? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार सजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य नागरिक आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद. महापालिका, नगर पालिकेत पाठवतो. स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहेत. महाराष्ट्राच स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व असून त्यांची ताकद आहे. अशा या महत्त्वाच्या निवडणुकीतही विधानसेप्रमाणे मतदारयादीत घोटाळा आणि यंत्रणेत घोळ होणार असेल तर या निवडणुकांना काही अर्थ नाही. याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य आणि केंद्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवदेन दिले. त्यावर त्यांनी काहीही निर्णय न घेता, ते निवदेन केंद्राकडे पाठवले आहे. त्यांना निर्णय घ्यायचे नसतील तर राज्यात त्यांना राज्यात कशासाठी नेमले आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे, हे बरोबर आहे. मात्र, ही प्रक्रिया करण्यापूर्वी मतदार यादीतील दोष दुरुस्त करावेत, असे मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली. त्यांनी 5-7 वर्षे निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आणखी 2-3 महिने वाढले तर काय फरक पडणार आहे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदार याद्या या निर्दोष असायला हव्यात, त्याशिवाय निवडणूक घएणे, ही लोकशाहीची थट्टा ठरेल, ही भूमिका आम्ही मांडली, त्याबाबतचे निवेदन दिले. त्यांनी आता दिल्लीतील निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आता काय करायचे, अशी विचारणा केली आहे. याचाच अर्थ राज्यातील प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. आता काय करायचे असा प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात, ते त्यांच्या हातात आहे. जी बोगस नावे, मतदारयादीत घुसवली आहेत, ती डिलीट करा आणि जी नावे वगळण्यात आली आहेत, ती यादीत समाविष्ट करा, असे ते म्हणाले.