
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून डीपी मिळावा, या मागणीसाठी हिंगोली महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी आज मंगळवारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर टाळ वाजवत बोंबाबोंब आंदोलन सुरू केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी डीपी मिळावा, या मागणीसाठी मागील पाच ते सहा वर्षांपासून महावितरण कार्यालयाचे उंबरठे भिजवले आहेत. परंतु, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आज मंगळवारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर हातात झेंडे घेत टाळ वाजवत बोंबाबोंब आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, शहरप्रमुख रवी पप्पलू यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले आहे.
shivsena ubt protest at hingoli mahavitaran office for farmers dp demand
shivsena ubt and farmers staged a loud ‘bombabomb’ protest at the hingoli mahavitaran office demanding electricity transformers (dp). the protest comes after years of neglect by officials. updates on saamana.
Keywords: saamana, samana, samna, daily saamana, दैनिक सामना, सामना, shivsena ubt protest hingoli, mahavitaran office hingoli, sengaon farmers dp demand, wasim deshmukh shivsena, ganesh shinde shivsena, ravi pappalu shivsena, marathi news updates.


























































