उरणमध्ये शिवसेनेचा ‘भगवा’च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, चिरनेर

उरण तालुक्यातील आवरे व गोवठणे या ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेच्या सरपंच दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत.

आवरे ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून शिवसेनेच्या नीरा सहदेव पाटील यांनी दणदणीत मतांनी विजय संपादन करून भगवा फडकविला. गोवठणे ग्रामपंचयातमध्ये शिवसेनेच्या प्रणिता प्रदीप म्हात्रे यांनी दणदणीत मतांनी विजय संपादन करून शिवसेनेला एकहाती विजय मिळवून दिला. विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पं स सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, महेश वर्तक यांनी अभिनंदन केले.