
अमेरिकन पॉप स्टार रिहानाच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिहाना घरात असताना हा गोळीबार करण्यात आला. आरोपी महिला टेस्ला कारमध्ये बसली होती. तेथून तिने रिहानाच्या घरावर गोळीबार केला. घरावर एकाच वेळी धडाधड अनेक गोळ्या झाडल्या. त्यानंतर तेथून ती पसार झाली. आरोपी महिलेने एकूण 10 गोळ्या झाडल्या. यात रिहानाला कोणतीही दुखापत झाली नाही. ती सुखरूप आहे.

























































