आता राष्ट्रीय शिबीर नेमबाजांसाठी बंधनकारक नसेल

राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एनआरएआय) वतीने 5 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय शिबिराचे आयोजन नवी दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर करण्यात आले आहे.

मात्र हिंदुस्थानातील कोरोनाच्या स्थितीत अद्यापही सुधारणा झाली नसल्यामुळे इतर राज्यांतील नेमबाज नवी दिल्ली येथे जाण्यास तयार नाहीत. तसेच या कॅम्पच्या आयोजनाला स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडूनही (साई) ग्रीन सिग्नल मिळणे बाकी आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर रोजी एनआरएआयकडून हे शिबीर खेळाडूंसाठी पर्यायी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे या शिबिरातील सहभाग हा बंधनकारक नसणार आहे.

ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया शिबिरासाठी 108 खेळाडूंच्या नावांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये पुरुष तसेच महिलांचाही समावेश आहे.

रायफल व पिस्तोल प्रकारात सहभागी होणाऱया नेमबाजांना शिबिरातील सर्व दिवस सराव करावा लागणार आहे. पण शॉटगन शूटर्सना 20 ते 30 ऑक्टोबर या कालावधीतच सराव करावा लागेल. आता या शिबिराला किती खेळाडूंचा सहभाग लाभतोय हे येणाऱया दिवसांमध्येच कळून येईल.

आपली प्रतिक्रिया द्या