‘फ्लिकर’च्या चित्रीकरणाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘फ्लिकर’ असं काहीसं वेगळंच नाव असलेल्या मराठी सिनेमाचं शूटिंग नुकतंच सुरू झालंय. निर्माते राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बॅनरखाली या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमांत राजवीर सरकार हा नवोदित अभिनेता पदार्पण करतोय. हँडसम लूक, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि लक्षवेधी अभिनयशैली यांच्या बळावर तो प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही. त्याच्यासोबत तन्वी किशोर ही अभिनेत्री चमकणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पाडावे करीत असून ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांच्या जादुई संगीताचा स्पर्श या सिनेमाला लाभलाय. याशिवाय ‘कोलावरी डी…’ फेम धनुषने यात एक गाणंही गायलं आहे. या सिनेमात सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव घाटणेकर, मनीषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्के यांच्या भूमिकाही पाहायला मिळतील.