दुकान जाळून 1 लाख 68 हजारांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

दुकानात आग लागल्याची माहिती सांगणाऱ्यानेच दुकान जाळल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. त्यामुळे दिलेल्या तक्रारीवरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 लाख 68 हजार रुपयांचे नुकसान दुकान जाळून करण्यात आले आहे.

या प्रकरणी जमीर हामजा पठाण यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, खोपेगाव येथील लक्ष्मण दाडगे यांच्या जागेत पत्र्याचे शेडमध्ये हॉटेल व नारळ, फुलं व साहित्य विक्रीचे फिर्यादीचे दुकान आहे. मारोती मोरे यांनी त्यांना फोन करून सांगितले की, दुकानात आग लागली आहे. फिर्यादी व त्याचा मित्र हे तत्काळ घटनास्थळी गेले. अग्निशमन विभागाची गाडी बोलावून घेऊन आग विझवण्यात आली.

आगीत सुमारे 1 लाख 68 रुपयांचे साहित्य जळाले. सदरील आग मारोती मोरे यांनीच लावल्याचे तक्रारीत नमूद केले असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.