
हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध रोखण्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील युद्ध रोखल्याचा दावा केला आहे. या दोन्ही देशांच्या सीमेवर होत असलेला गोळीबार आणि हिंसाचार पाहात युद्धासारखी स्थिती होती. परंतु यांच्यात होणारी युद्ध रोखण्यात मला यश आले, असे ट्रम्प प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. आधी खूपच वाईट परिस्थिती होती. परंतु, आता सर्वकाही ठीक आहे, असे त्यांनी सांगितले.
बांगलादेशचे ‘एनएसए’ हिंदुस्थान दौऱ्यावर
बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) खलीलूर रहमान दोन दिवसाच्या हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहेत. हिंदुस्थानचे सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्या निमंत्रणावर खलीलूर रहमान हे 19 ते 20 नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानात येणार आहेत. ते या ठिकाणी कोलंबो सुरक्षा संमेलनाची सातव्या बैठकीत सहभागी होतील. यावेळी ते डोवाल यांची भेट घेणार आहेत. याआधी या दोन्ही नेत्यांची भेट 4 एप्रिलला बँकॉकला झाली होती. या बैठकीत द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली जाऊ शकते.
पाकिस्तानच्या दोन न्यायाधीशांचा राजीनामा
पाकिस्तानातील वादग्रस्त ठरलेल्या 27 व्या संविधान संशोधनाला मंजुरी मिळाल्यानंतर पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयातील दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. न्यायाधीश मन्सूर अली शाह आणि न्यायाधीश अतहर मिनल्लाह अशी या न्यायाधीशांची नावे आहेत. पाकिस्ताचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. यामुळे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याची चिंता अधिक गडद झाली आहे.
हिंदुस्थानातून आता थेट कंबोडियासाठी विमान
हिंदुस्थान आणि कंबोडिया या दरम्यान हवाई प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला आहे. इंडिगो एअरलाइनने हिंदुस्थानातील कोलकाताहून पंबोडियासाठी थेट विमान सेवा सुरू केली आहे. ही विमानसेवा आठवडयातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी चालवली जाणार आहे. पंबोडियाचे पर्यटनमंत्री हुओत हाक यांनी या फ्लाइटची माहिती दिली. सीएम रीपला पंबोडियाचे सांस्पृतिक आणि ऐतिहासिक पेंद्र म्हटले जाते. यामुळे पर्यटकांना आता थेट हवाई प्रवासाची संधी मिळेल.




























































