
व्हॉट्सऍप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर आणत असते. लवकरच व्हॉट्सऍपवर इन्स्टाग्राम रिलवरील शॉर्ट व्हिडीओचा आनंद घेता येणार आहे. आगामी काळात व्हॉट्सऍपवर एक खास टॅब दिसेल, ज्यावर इन्स्टाग्राम रिल्सचे छोटे व्हिडीओ युजरला बघता येतील. सध्या या फीचरवर चाचणी सुरू आहे.
व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम या फेसबुकच्या मालकीच्या कंपन्या आहेत. अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इंटिग्रेशनवर जोर देण्यात आला आहे.
डब्ल्यूएबेटा इन्फोच्या वृत्तानुसार, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची वैशिष्टय़े इंटिग्रेशन करण्याचा फेसबुकचा विचार आहे. येत्या काही दिवसांत व्हॉट्सऍपवर इन्स्टाग्रामचा वैशिष्टय़ांच्या आनंद घेता येणार आहे. इन्स्टाग्रामचे रिल हे फिचर टिकटॉकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.




























































