स्थापत्य समितीसाठी श्रद्धा जाधव, विधी समितीसाठी हर्षद काटकर यांचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या सहा वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले. स्थापत्य समितीसाठी श्रद्धा जाधव तर विधी समितीसाठी हर्षद काटकर यांनी अर्ज भरला. या सर्व समित्यांवर शिवसेना आणि भाजप असा थेट मुकाबला होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांतही राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता असून काँग्रेस पक्ष तटस्थ राहणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्यावतीने स्थापत्य समिती (शहर)अध्यक्ष पदासाठी श्रद्धा जाधव, उपाध्यक्ष पदासाठी दत्ता पोंगडे, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष पदासाठी श्रीकांत शेटये, उपाध्यक्ष पदासाठी दिनेश कुबल, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पदासाठी प्रवीणा मोरजकर, उपाध्यक्ष पदासाठी वसंत नकाशे, बाजार आणि उद्यान समिती अध्यक्ष पदासाठी चंद्रावती मोरे, उपाध्यक्ष पदासाठी सुरेश पाटील, विधी समिती हर्षद काटकर, उपाध्यक्ष पदासाठी ऍड. संतोष खरात, महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी राजराजेश्वरी रेडकर तर उपाध्यक्ष पदासाठी उर्मिला पांचाळ यांनी अर्ज भरले आहेत.