श्रद्धा कपूरच्या घरी लगीन घाई, 2020 मध्ये उडणार लग्नाचा बार

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगली आहे. श्रद्धा तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत 2020 मध्ये लग्न करणार असून तिच्या घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाल्याचे समजते. अद्याप याबाबत श्रद्धा किंवा तिच्या कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

shraddha-kapoor

श्रद्धा तिचा सहकलाकार आदित्य रॉय कपूर व फरहान अख्तर यांना डेट करत असल्याच्या चर्चांवरून प्रचंड गॉसिप झाले होते. श्रद्धा फरहानसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये देखील राहत असल्याचे देखील बोलले गेलेले. मात्र सध्या फरहान हा शिबानी दांडेकरसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. तर श्रद्धा ही रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी ती रोहनसोबत तुर्की फिरायला देखील गेली होती. तेथून परत आल्यानंतर श्रद्धा व रोहिनच्या कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेतली असून त्यांच्या या दोघांच्या लग्नाची चर्चा झाल्याचे समजते. श्रद्धाची आई शिवांगी कपूर तिच्या लग्नाच्या तयारीला देखील लागल्याचे समजते.

सध्या श्रद्धा तिचा आगमी बिग बजेट सिनेमा साहोच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बाहुबलीचा अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तसेच लवकरच ती वरूण धवनसोबत स्ट्रीट डान्सर या चित्रपटात दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या