
रताळे बाजारात दिसू लागले की उपवासाचे दिवस जवळ आले आहेत हे आपल्या लक्षात येते. उपवासाच्या दिवशी रताळ्याचा किस, तिखट काप किंवा गोड काप, रताळ्याची उपवासाची भाजी इत्यादी वेगवेगळ्या उपवासाच्या पाककृती बनवल्या जातात. अर्थात रताळे हे आपण उपवास नसलेल्या दिवशी देखील खाऊ शकतो.
रताळ्याचे गोड काप
साहित्य
1- टीस्पून तूप
1 – कप रताळे (रताळे) चे पातळ काप
1- टीस्पून काजू
2- टीस्पून किसलेला ताजा नारळ
3/4- कप साखर
वेलची पावडर
कृती
रताळे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावे. रताळे खोलगट टोपामध्ये किमान अर्धा तास पाण्यात तसेच ठेवावे. म्हणजे त्याची माती नीट निघून जाईल.
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करुन घ्यावे.
पाण्यातून स्वच्छ झालेल्या रताळ्याचे बारीक काप करुन घ्यावेत.
हे काप तुपात घालून हलक्या हाताने परतावेत. त्यानंतर त्यामध्ये काजू घालावे.
तुम्हाला आवडत असल्यास यात बदाम, मनुका देखील घालू शकता.
त्यानंतर खोवलेला नारळा घालावा.
व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
झाकण ठेवून मध्यम आचेवर रताळ्याचे काप किमान 3-4 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावेत.
रताळे लवकर हे पटकन शिजते. त्यानंतर रताळ्यामध्ये एखादा टोकदार चमचा किवा सुरी घालून शिजले की नाही पाहावे.
शिजल्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढून साखर घालावी. हा पदार्थ पटकन होण्यासाठी, पिठीसाखर वापरणे सर्वात उत्तम.
सर्वात शेवटी वेलची पावडर घालावी, नंतर गॅस बंद करावा.
रताळ्याचे काप गरमागरम सर्व्ह करावेत.