एक दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा यूपीएससी क्रॅक

यूपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा असते. दरवर्षी लाखो लोक ही परीक्षा देतात. मात्र त्यातील काही मोजकेच यूपीएससी क्रॅक करतात. जर तुम्ही पूर्ण समर्पण आणि संयमाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. श्रेया त्यागीची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. श्रेयाने एक दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा यूपीएससी क्रॅक केली व आयएफएस (परराष्ट्र सेवा) अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

श्रेया त्यागी मध्यमवर्गीय घरातून आहे. तिने 2019-20 मध्ये दिल्ली विद्यापीठातील कमला नेहरू कॉलेजमधून पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. श्रेयाने यूपीएससीमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. 2021 मध्ये पहिल्या प्रयत्नात तिची वाणिज्य विभागात निवड झाली आणि राखीव यादीत चौथा क्रमांक मिळाला. 2022 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात तिची भारतीय संरक्षण लेखा सेवेत निवड झाली आणि 319 वा क्रमांक मिळाला. 2023 मध्ये तिसऱया प्रयत्नात तिची कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात निवड झाली व 123 वा क्रमांक मिळाला. 2024 मध्ये चौथ्या प्रयत्नात तिची आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) मध्ये निवड झाली आणि 31 वा क्रमांक मिळाला.

  • श्रेयाला आयएफएस व्हायचे होते. तिने सलग सहा वेळा प्रयत्न केले. अखेर 2024 साली तिचे स्वप्न पूर्ण झाले. श्रेया सांगते, मी फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित केले.
  • जेवण बनवणे, फिरायला जाणे यांसारख्या सवयींमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली. रोज आठ तास अभ्यास करत होते. मात्र स्वतःसाठी वेळ काढत होते.
  • श्रेया त्यागीची कहाणी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.