श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार

617

‘‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी माझी निवड होण्यास गेल्या काही मालिका महत्त्वपूर्ण ठरल्या. या क्रमांकावर खेळण्यासाठी आमच्यात जणू एक प्रकारे स्पर्धाच सुरू होती,’’

नागपूर ः चौथ्या क्रमांकावर कुणाला खेळवायचं? या प्रश्नाचं उत्तर आता मुंबईकर श्रेयस अय्यरच्या यशस्वी कामगिरीमुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला मिळाले आहे. यापुढे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये युवा फलंदाज श्रेयस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. संघ व्यवस्थापनाने आपल्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितलं असल्याचं श्रेयसने नागपूर टी-20 तील विजयानंतर सांगितले.

… तर फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल

टीम इंडियातील दोन प्रमुख फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे लवकर बाद झाले, तर श्रेयस ‘फिनिशर’ची भूमिका निभावणार आहे असेही मानले जात आहे. श्रेयसनेही आपली झुंजार वृत्ती दाखवत चौथ्या क्रमांकाला न्याय देऊन संघासाठी चमकदार कामगिरी साकारण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या