श्रेयस तळपदे पहिल्यांदा दिसणार नकारात्मक भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ठरावीक धाटणीच्या भूमिकांव्यतिरिक्त चित्रपटामधेये एखादी नवीन आणि वेगळी भूमिका साकारणे आव्हानात्मक असते. परंतु आपल्या नवीन चित्रपटातून श्रेयस तळपदे याने हे सिद्ध केले आहे की एक उत्तम अभिनेता आपल्या अभिनयाने कोणत्याही भूमिकेला न्याय देऊ शकतो.

नुकताच श्रेयसचा सेटर्स हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत आपल्या प्रेक्षकांना दिसणार आहे. आजपर्यंतच्या हास्यात्मक भुमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या श्रेयसने पहिल्यांदाच ही भूमिका साकारून आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. आपल्या अभिनय करिअरमध्ये पहिल्यांदा नकारात्मक भुमिकेसाठी त्याने अथक प्रयत्न केल्याचे या चित्रपटातून दिसून येत आहे. त्याच्या अभिनयाला आणि कलेला त्याच्या प्रेक्षक वर्गासोबतच, समीक्षका आणि साऱ्यांनीच उचलून धरले आहे.

आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप पाडलेल्या या मेहनती आणि कौशल्यपूर्ण अभिनेत्याला त्याच्या पात्रतेनूसार संधी का मिळत नाही. असे बॉम्बे टाईम्सच्या मुलाखतीतून समोर आले आहे. नागेश कुकुनूरच्या 2005 मधील इकबाल या चित्रपटामधून श्रेयसने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीला त्याने आपल्या अभिनयाने पछाडले होते. अलिकडच्या वर्षांत श्रेयसने गोलमाल स्लॅपस्टिक सिरीजमध्ये दुय्यम तर कधी तृतीयदर्शी भूमिका बजावल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या सेटर्स मध्ये श्रेयस अपूर्वची भूमिका बजावताना दिसत आहे आणि त्यातून त्याची या भूमिकेबद्दलची मेहनत दिसत आहे. ही अतिशय महत्वाची आणि उत्तम बाब आहे. असे फर्स्ट पोस्टच्या मुलाखतीनुसार समोर येते.

श्रेयसच्या आजपर्यंतच्या चित्रपटांचा विचार करता त्याने साकारलेल्या प्रत्येक पात्राला त्याने न्याय दिला आहे. प्रत्येकवेळी त्याची गुणवत्ता त्याने सिद्ध केली आहे. इकबालमधील श्रेयसच्या मूक पात्राने प्रेक्षकांना आत्मप्रेरक करत आश्चर्यचकित केले. सेटर्स मधून श्रेयसने आपल्या अभिनयाच्या पातळीला उंचावले आहे. त्यामुळे सेटर्समधील त्याची ही वेगळी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.