Photo – श्री तुळजाभवानी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात

शारदीय नवरात्र महोत्सवात आज दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात संपन्न झाली. मध्यरात्री चरणार्थ विधीनंतर पहाटे सहा वाजता देवींच्या अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्रालंकार परिधान करण्यात आले. त्यानंतर देवीला महिषासुरमर्दिनी स्वरूपात अलंकृत करण्यात आले.