श्रीगोंद्यात दोन बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

श्रीगोंदा तालु्क्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय अंदाजे 50 ते 55) तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय अंदाजे 30 ते 40) असे दोन बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या संदर्भात पारनेर, सुपा, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा पोलिसांना मृतांची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले आहेत, आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. दरम्यान, मृतदेह सापडल्याने बेलवंडी, घोटवी परिसरात खळबळ उडाली आहे.