एसएनडीटी विद्यापीठाचा आज स्थापना दिवस

देशात महिला शिक्षणाचा वारसा चालविणाऱया श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा (एसएनडीटी)चा 108 वा स्थापना दिवस सोहळा उद्या विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.

सोहळय़ात विद्यापीठातील आध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांस ‘महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ आणि ‘सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्कार’ देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.