Photo – मिंट ग्रीन साडीत श्रुतीचा रॉयल अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रुती हसनने नेसलेली ही साडी मेटॅलिक सिल्व्हर आणि फिकट मिंट ग्रीन शेडमधील एक प्रीमियम सिल्क साडी आहे. साडीवर अत्यंत सुबक असे पारंपारिक जरीकाम केलेले आहे, ज्यामुळे तिला एक रॉयल आणि मॉडर्न लूक मिळाला आहे. साडीला मॅचिंग असाच शॉर्ट-स्लीव्ह्ज असलेला आणि स्वीटहार्ट नेकलाईन डिझाईनचा ब्लाउज परिधान केला आहे. जो या लूकला अधिक आकर्षक बनवतो. या लूकवर श्रुतीने गळ्यात डार्क ग्रीन एमरल्ड खड्यांचे कॉम्बिनेशन असलेला चोकर नेकलेस, मॅचिंग इअररिंग्स, हातामध्ये सुंदर कडे आणि एक मोठी अंगठी घातली आहे. तसेच केसांना सॉफ्ट कर्ल्स देऊन स्टाईल केले आहे. ज्यामुळे श्रुतीचे दागिने स्पष्टपणे हायलाईट होत आहेत. या साडीवर श्रुतीने न्यूड लिपस्टिक, हलके स्मोकी आइज आणि परफेक्ट कॉन्टूरिंगसह मिनिमल पण ग्लॅमरस मेकअप केला आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.