
कर्णधारपदाची माळ गळ्या पडल्यापासून शुभमन गिलचा स्वप्नवत फॉर्म सुरू झाला आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघताहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा काटेरी मुकूट गिलच्या डोक्यावर आला होता. त्यात पहिलाच दौरा इंग्लंडचा. या दौऱ्यात हिंदुस्थानचा संघ इंग्लंडपुढे ढेपाळणार अशा वल्गना केल्या जात होत्या. मात्र लीड्समध्ये झालेल्या पहिल्या लढतीत गिलसह पाच फलंदाजांनी शतक ठोकले.
अर्थात खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे हिंदुस्थानने हा सामना गमावला. पण एजबेस्टमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानने दमदार खेळ करत पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. यात सर्वाधिक वाटा उचलला तो कर्णधार गिलन याने. त्याने 30 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 269 धावांनी मॅरेथॉन खेळी केली.
इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकणारा तो पहिला आशियाई कर्णधारही ठरला. तसेच इंग्लंडमध्ये कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूने ठोकलेल्या या सर्वोच्च धावा ठरल्या. गिलने आधी रविंद्र जडेजा, मग वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत मोठी भागिदारी करत संघाला धावांचा डोंगर उभारून दिला. ठोकत गिलने इंग्लंडच्या गोलंदाजांना थकवले. एकेरी-दुहेरी धावांवरही त्याने लक्ष केंद्रित केले होते. या दरम्यान तळाला फलंदाजीला आलेल्या आकाश दीपला गिलचा ओरडाही खावा लागला.
विराट किंवा सचिन तेंडुलकर नाही, जोस बटलरने सांगितलं जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव
हिंदुस्थानच्या डावातील 140 व्या षटकामध्ये गिलने चेंडू टोलवला आणि स्ट्राईक आपल्याकडे रहावी म्हणून धावू लागला. मात्र आकाश दीप याचे गिलकडे लक्ष नव्हते. चेंडू ओली पोपजवळ गेला आणि त्याने झेप घेत होत अडवला. त्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाकडे फेकला. थ्रो अचूक नसल्याने आकाश दीप वाचला, अन्यथा त्याची विकेट पक्की होती. यामुळे गिलच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्याने आकाश दीपला चांगलेच सुनावले. गिल आकाश दीप जवळ पोहोचला आणि म्हणाला, ‘नुसता बघतोस काय? लवकर पळत जा.’ याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
— Nihari Korma (@NihariVsKorma) July 3, 2025
इंग्लंड 510 धावांनी पिछाडीवर
दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानने 587 धावांचा एव्हरेस्ट उभारला. त्यानंतर हिंदुस्थानने इंग्लंडची 3 बाद 77 अशी अवस्था करत त्यांना फॉलोऑनच्या दहशतीखाली आणले. इंग्लंडचा संघ 510 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडवर फॉलोऑन लादण्यासाठी त्यांचा पहिला डाव 387 धावांच्या आत गुंडाळण्याचे हिंदुस्थानचे मिशन राहील.