सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद झाले आहेत. शनिवारी सकाळी दक्षिण सियाचीन भागात लष्करी जवानांचे पथक गस्तीवर असतानाच ही दुर्घटना घडली. गस्ती पथकावर बर्फाचा कडा कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने धाव घेत सर्व जवानांना बर्फाच्या ढिगाऱयाखालून बाहेर काढले. या जवानांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचारादम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानचे चार जवान हिमस्खलनामुळे शहीद झाले होते.