
कर्नाटक राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा काँग्रेस नेता आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्घारमैय्या यांनी केला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धारमैया म्हणाले की, मी माझ्या पक्ष कार्यकर्त्यांना तयार राहण्यासाठी सांगितलं आहे. येडियुरप्पा यांचं सरकार फार काळ चालणार नाही. बंडखोर आमदारांसह सरकार चालवणं सोपं नाही. जी मुलं फक्त दूध पितात, ती फार काळ जिवंत राहु शकत नाहीत, मग विष प्यायलेली मुलं कशी वाचू शकतील, असं कसं होईल, असं सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे.
जुलै महिन्यात कर्नाटकात राजकीय नाट्य घडले होते. कुमारस्वामी यांच्या सरकारमधील 30 मंत्र्यांनी एकाच दिवसात मंत्रीपदाचा राजीनामे दिले होते. त्यामुळे कुमारस्वामींचे सरकार पडले होते. त्यानंतर भाजपची सत्ता स्थापन झाली आणि भाजपच्या येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन केलं आहे.























































