राज्य मानांकन कॅरम स्पर्धा – सिद्धांतचा तिसऱ्या सेटमध्ये थरारक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने तसेच झेनेटिक स्पोर्ट्सच्या सहकार्याने ‘सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम’, पुणे येथे आज ‘विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला’ सुरुवात झाली. आज खेळवण्यात आलेल्या पुरुष एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने तीन सेटपर्यंतच्या रंगतदार लढतीत पुण्याच्या इम्तियाझ हन्नुरेचा १८-१४, १८-२०, २५-४ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

तत्पूर्वी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांच्या हस्ते फीत कापून व कॅरमचा एक डाव खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान व यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, स्पर्धा संघटन सचिव अभिजित मोहिते, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे कार्याध्यक्ष आशुतोष धोडमिसे व सचिव सुशील गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे:

  • अभिषेक पोद्दार (मुंबई) वि. वि. गिरीश पवार (ठाणे) ८-२१, २५-०, २५-८

  • ओमकार टिळक (मुंबई) वि. वि. नितीन शिरसाठ (रायगड) २५-२, २५-४

  • चेतन कोळी (मुंबई) वि. वि. दत्तात्रय गायकवाड (सातारा) २५-०, २५-८

  • मिहीर शेख (मुंबई) वि. वि. सुजीतकुमार उके (पुणे) २५-५, १८-१४

  • संजय मणियार (मुंबई उपनगर) वि. वि. सचिन बांदल (पुणे) २४-१४, २३-१०

  • गौरव हुदळे (कोल्हापूर) वि. वि. राहुल जगताप (पुणे) २५-०, १९-१

  • कुणाल राऊत (ठाणे) वि. वि. धम्मराज लोंढे (पुणे) २३-८, २४-१५

  • सलमान खान (मुंबई) वि. वि. किरण लोंढे (सांगली) २५-०, २५-९

  • अनुराग दुबळे (पुणे) वि. वि. हर्षद डांगी (मुंबई उपनगर) २५-०, २३-०

  • उमेश खरात (सातारा) वि. वि. इर्फान शेख (पुणे) २५-१५, २५-९

  • संदीप दिवे (जळगाव) वि. वि. मुकेश इंगुळकर (पुणे) २५-१०, २४-०