सावधान…वारंवार पेनकिलर घेताय? होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

3813

थोडी सर्दी झाली, अंग दु:खू लागले, थोडासा ताप आल्यास अनेकदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधाच्या दुकानातून गोळ्या औषधे घेतात. लोक बऱ्याचदा आजारी पडल्यावर आजारपण अंगावर काढतात. तर अनेकवेळा आजारी व्यक्ती स्वत:च्या मनाने औषधाच्या दुकानात जाऊन पेनकिलरच्या गोळ्याही विकत घेतात. मात्र, आजारी पडल्यावर स्वत:च्या मनाने पेनकिलरच्या गोळ्या खाणे जीवघेणे ठरू शकते. पेनकिलर खाणे जीवाला अत्यंत धोकादायक असल्याचे नुकत्याच एका संशोधनात आढळून आले आहे.

पेनकिलरच्या गोळ्या खाल्याने अनेकदा आजार बरा होतो. मात्र चुकीच्या पेनकिलर किंवा अधिक प्रमाणात पेनकिलर गोळ्या घेतल्यामुळे आजारी व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. या पेनकिलरमध्ये पॅरासिटामॉल, आइब्रूप्रोफेन या गोळ्यांचा सामावेश आहे. पॅरासिटामॉल ही गोळी साधारणतं ताप आल्यावर घेतात. मात्र पॅरोसिटामॉल ही गोळी डॉक्टरांना न विचारता वारंवार घेतल्याने अॅसिडीटी आणि पोटात अल्सराचा त्रास होण्याचा धोका संभावतो. पॅरासिटीमॉल ही 6-7 तासांमध्ये एकदाच खावी अन्यथा पेनकिलर शरीराला हानिकारक ठरू शकते. तर इब्रुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल या दोन गोळ्यांना एकत्र करून आयब्रूप्रोफेन पेनकिलर बनवली जाते. या पेनकिलरचं वारंवार सेवन केल्याने फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो आणि दमा होऊ शकतो. या व्यक्तिरिक्त रक्तदाब, थायरॉयड सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पेनकिलर गोळ्यांचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ला घेऊन करावे.

तसेच कफसिरपमुळे शिंक येणे, खोकला आणि सर्दी सारखे रोग आजार बरे होतात. मात्र याचे जास्त सेवन केल्यावर शरीरात सुस्ती आणि वारंवार झोप येते. तसेच कफ सेवनच्या अधिक सेवनाने दृष्टीही कमजोर होण्याचा धोका संभवू शकतो. त्यामुळे कफसिरप हे डॉक्टरांचा सल्ला घेऊन सेवन करावे. पेनकिलर सारख्या गोळ्यांचे अधिक सेवन केल्यावर बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर पेनकिलर देताना अँटिसिडही देतात. कारण त्याने बद्धकोष्ठता होत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या