
कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शुक्रवारी (21 नोव्हेंबर 2025) अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पारकर व नगरसेवक पदाच्या १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ३ तर १७ नगसेवकपदासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ९ व प्रभाग ३ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर १५ प्रभागांमध्ये दुरंगी लढत भाजप व शहर विकास आघाडीमध्ये होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे समीर नलावडे, शहरविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत होईल.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौरभ पारकर, नगरसेवक पदाचे माघार घेतलेले उमेदवार – प्रभाग १ राजेश राणे, प्रभाग २ रोहिणी पिळणकर, प्रभाग ३ शिवम राणे, प्रभाग ४ श्रेया पारकर, प्रभाग ७ सोनाली कसालकर, प्रभाग ८ किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग १२ साक्षी नेरकर, प्रभाग १५ सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग १६ हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग १७ मयुरी नाईक आदी उमेदवारांचा सामावेश आहे. त्यामुळे १७ नगरसेवक पदाच्या जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ३ उमेदवार रिंगणात आहेत.
या उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढती
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून संदेश पारकर तर लोकराज्य जनता पक्षाकडून गणेशप्रसाद पारकर हे तीन उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये क्रांतिकारी विचार पक्षाचे तेजस राणे व भाजपचे राकेश राणे, प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपकडून प्रतीक्षा सावंत व क्रांतिकारी विचार पक्षाच्या साक्षी आमडोसकर ,प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपकडून स्वप्नील राणे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून सुमित राणे, आपकडून संजय पवार, प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपकडून माधवी मुरकर, क्रांतिकारी विचार पक्षाकडून जुई मुरकर, प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपच्या मेघा गांगण, क्रांतिकारी विचार पक्षाकडून स्नेहा वाळके, प्रभाग ६ मधून भाजपच्या स्नेहा अंधारी, क्रांतिकारी विचार पक्षाकडून सुमेधा अंधारी, प्रभाग क्रमांक ७ मधून भाजच्या सुप्रिया नलावडे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून सुमेधा अंधारी, प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपकडून गौतम खुडकर, क्रांतिकारी विचार पक्षाकडून लुकेश कांबळे, प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपकडून मेघा सावंत, क्रांतिकारी विचार पक्षाकडून रिना जोगळे, अपक्ष मधुरा मालंडकर, प्रभाग क्रमांक १० मधून भाजपकडून आर्या राणे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून शीतल मांजरेकर ,प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपकडून मयुरी चव्हाण, क्रांतिकारी विचार पक्षाकडून दीपिका जाधव, प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपकडून मनस्वी ठाणेकर, क्रांतिकारी विचार पक्षाकडून प्रांजली उर्फ रेश्मा आरोलकर, प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून जयेश धुमाळे , प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपकडून शहराध्यक्ष अण्णा कोदे, क्रांतिकारी विचार पक्षाकडून राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपकडून विश्वजित रासम, क्रांतिकारी विचार पक्षाकडून संकेत नाईक, प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपकडून संजय कामतेकर, क्रांतिकारी विचार पक्षाकडून उमेश वाळके, प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, क्रांतिकारी विचार पक्षाकडून सुशांत नाईक या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.





























































