
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
शिवसेना खासदार विनायक राऊत हे ४ व ५ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजता – ग्रामपंचायत कार्यालयास भेट. (स्थळ- चेंदवण ता.कुडाळ), चेंदवण माऊली मंदिर पडोसवाडी रस्ता( CMJSY) भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- चेंदवण ता. कुडाळ), सायंकाळी ६:१५ वा. केरवाडा येथील हायमास्टच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- केरवाडा, शिरोडा ता. वेंगुर्ले), सोमवार दि. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. बीएसएनएल टॉवर भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- कवठी ता. कुडाळ), सकाळी ११.३० वा. केळुस तारादेवी मंदिर ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र नामफलक अनावरण कार्यक्रमास उपस्थिती ( केळुस ता.वेंगुर्ले), बीएसएनएल टॉवर भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- केळुस ता. वेंगुर्ले), खालचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- केळुस ता. वेंगुर्ले), दुपारी १.०० वा. बीएसएनएल टॉवर भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- आसोली ता. वेंगुर्ले), दुपारी ३.३० वा. दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ- पालकमंत्री यांचे कार्यालय सावंतवाडी), सायंकाळी ६.०० वा. बीएसएनएल टॉवर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ- कुणकेरी ता. सावंतवाडी), सायंकाळी ७.०० वा. बक्षिस वितरण समारंभास उपस्थिति (स्थळ- आंबेगाव ता. सावंतवाडी)
































































