आयएनएक्सप्रकरणी नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर यांना जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर यांच्यासह आणखी काहीजणांना अंतरिम जामीन मंजूर केला. विशेष न्यायमूर्ती अजयकुमार कुहार यांनी अर्थमंत्र्यांचे माजी ओएसडी प्रदीपकुमार बग्गा, एफआयपीबीचे माजी संचालक प्रबोध सक्सेना अर्थमंत्रालयाच्या एफआयपीबीचे माजी सेक्शन अधिकारी अजितकुमार डुंगडुंग, एफआयपीबीचे तत्कालीन अवर सचिव रबींद्र प्रसाद आणि माजी संयुक्त सचिव डीईए अनुप तिवारी यांनाही यावेळी जामीन मंजूर केला. दोन लाख रुपये रोख आणि तेवढय़ाच जामीन रकमेवर या सर्वांना अंतरिम जामीन देण्यात आला. या जामिनाप्रकरणी सुनावणी सुरू होती तेव्हा याच खटल्यातील आरोपी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही न्यायालयात सादर करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 17 डिसेंबरला होणार आहे.