सध्या अनेक मराठी आणि हिंदी सिंगल गाणी यूटय़ूबवर धुमाकूळ घालत आहेत. त्यातच आता गायक-संगीतकार धवल चांदवडकर यांचे ‘मददगार’ हे सिंगल नुकतेच लाँच झाले आहे. या गाण्याला रसिकांची चांगली पसंती मिळतेय. ‘उलझनों की उंगलियां छोडना यू…जिंदगानी की कडी मोडना यू…’ असे या गाण्याचे बोल असून गीतकार क्षितिज पटवर्धन आहेत. ‘मददगार’ हा मूळचा उर्दू शब्द असून हे गाणे प्रेयसी किंवा देव जो कोणी आपली मदत करतो अशा मददगाराला केलेली विनंती आहे. गायक, संगीतकार धवल चांदवडकर यांनी गेल्या 12 वर्षांत देशविदेशात अनेक शोज केले आहेत. ‘चांदणे तुझ्यावरी…’ आणि ‘लागेल जन्मावे पुन्हा’ या त्यांच्या सिंगल्सना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ‘मददगार’ हे त्यांचे तिसरे गाणे असून यानिमित्ताने पहिल्यांदा त्यांनी हिंदी गाण्याला चाल लावली आहे. ‘मर्चंट रेकॉर्ड्स’ या यूटय़ूब चॅनेलसह जिओ सावन, अॅपल म्युझिक, स्पॉटिफाय आदी म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणे ऐकता येईल.