‘राजसा’ला मेलडीचा साज, गायिका स्नेहा पंत-देसाई यांचे पहिले मराठी गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायिका स्नेहा पंत-देसाई यांचे ‘राजसा’ हे मराठी सुमधुर गीत नुकतंच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. त्यांनी सुमारे 500 हून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. राजसा हे त्यांचे पहिले मराठी गाणे आहे. या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याला स्वरूप भाळवणकर यांचे संगीत दिग्दर्शन आणि उस्ताद तौफिक पुरेशी यांची रिदम अरेंजमेंट आहे.

स्नेहा पंत-देसाई या संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्या शिष्या आहेत. गोलमाल, हल्लाबोल, पार्टनर, मस्ती, यादें, एक और एक ग्यारह, ना तुम जानो ना हम, बागबान अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. गीतकार रोशनी भाळवणकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ’राजसा’ गाण्याचे शब्द अत्यंत अर्थपूर्ण असून गाण्याचे संगीत संयोजन नावीन्यपूर्ण आहे. सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदा यांच्या संगीताची झलक, मेलोडियसपणा या गाण्यात दिसतो. ‘राजसा’ गाणे स्वरूप भाळवणकर यांच्या ऑफिशिअल यूटय़ूब चॅनेलवर ऐकता येईल.