
बीड जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाने तांडव केले सकाळ पर्यंत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला आहे. आष्टी तालुक्यातील कडी कडा सिना नदीला मोठा पूर आला आहे, मुसळधार पावसाने शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यातील बिंदुसरा, सरस्वती, कुंडलीका, मांजरा, या मुख्य नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा पुन्हा संपर्क तुटला आहे. बंद केलेले धरणाचे दरवाजे पहाटे पुन्हा उघडण्यात आले आहे. मांजरा, माजलगाव, अप्पर कुंडलिका, सिंदफना धरणातून मोठा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे, अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. सतर्क तेचे आवाहन प्रशासनाने दिले आहेत.